सौर कृषी पंप शेतात बसावा आणि मिळवा हे फायदे

Solarpump

solar pump for agriculture

शेती करताना स्वस्त उपकरणांच्या सहाय्याने तसेच ऊर्जेच्या किफायती वापर करणे गरजेचे असते. जर कृषी पंपमध्ये आपण पारंपारिक कृषी पंपांचा विचार केला तर शेतकऱ्यांना बर्‍याच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु आता शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांनामुळे बऱ्याच प्रकारच्या फायदा होत आहे. सरकार सुद्धा यासाठी मदत देते. सौर कृषी पंपाचे फायदे काय याचा अभ्यास आपण या लेखात करणार आहोत.

सौर कृषी पंपाचे फायदे: Sour krushi pump

खर्च कमी
 सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंप मोफत मिळणाऱ्या सूर्य प्रकाशापासून चालतो. हे वीज आणि डिझेलसारख्या महागड्या इंधनांवर अवलंबून राहायची गरज राहत नाही. तसेच त्याला चालवण्यासाठी परत-परत पैसे टाकायची सुद्धा गरज येत नाही. सूर्यप्रकाशामुळे सोलर पॅनल चार्ज होते.  त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार सौर कृषी पंपला चालवून पाण्याचा उपयोग करू शकता.
महागड्या इंधनांची गरज नसते
 सौर कृषी पंपला लावल्यानंतर इतर ऊर्जास्रोतांची गरज राहत नाही. सौर कृषी पंपासाठी फक्त सूर्य प्रकाश आणि सोलर पॅनलची आवश्यकता असते.याद्वारे आपण कुठल्याही कोपऱ्यात पिकांना पाणी पोहोचू शकतो.  सौर कृषी पंप यांच्या वापरामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणात आत्मनिर्भर होत आहेत.

  सोपे आणि विश्वसनीय
 सौर ऊर्जेच्या मदतीने कृषी पंप चालवणे फार सोपे आहे. कारण यामध्ये फार कमी प्रमाणात उपकरणांची आवश्यकता असते. तसेच पारंपारिक कृषी पंपप्रमाणे विजेची कपात, कमी होल्टेज यासारख्या समस्या येत नाहीत. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही, त्याठिकाणी सौर कृषी पंप एक वरदान ठरत आहेत.


 पर्यावरणानुकूल
 सौर कृषी पंपामुळे कुठल्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. हे पर्यावरणासाठी अनुकूल आहे. कारण सौर कृषी पंपाला अशा कुठल्याही इंधनाने चालवले जात नाही, ती त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होईल. या कृषी पंपाद्वारे कुठलाही हानिकारक पदार्थ वातावरणात सोडला जात नाही. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचा समस्या दूर होते. पर्याप्त उत्पादकता
 उन्हाळ्यामध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यामध्ये सोलर पॅनल जास्त उन्हामुळे भरपूर प्रमाणात चार्ज होतात. तसेच पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सोलर एनर्जी कमी प्रमाणात तयार होते. तेव्हा तुम्ही पाण्याचा स्टोर करून ठेवू शकता.

आर्थिक लाभासाठी फायदेशीर


 सौर कृषी पंपाच्या वापरामुळे जास्त खर्च येत नाही.  सौर त्यामुळे तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा ऊर्जा ग्रेडला विकून उत्पन्नात एक चांगला स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

सौर कृषी पंप बसवणे सोपे असते.
सौर कृषी पंपांना बसवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या माणसांची आवश्यकता पडत नाही. जर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सौर कृषी पंपाचे स्थलांतर करायचे असेल त्तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: