केंद्र सरकारने या पिकाबाबत घेतला मोठा निर्णय

Toor News

Toor News

खरीप हंगामातील एकही पिक शेतकऱ्यांच्या हाती आलेले नाही. त्यातच हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून आता बाजारपेठेत सर्वच शेतीमालाचे दर कमी झाले आहेत.

तूर आयातीला परवानगी

खरिपातील शेवटचे पीक तुरीची आवक नुकतीच सुरु झाली असताना आता केंद्र सरकारने तूर आयातीला मुदतवाढ दिली आहे. त्याचा परिणाम थेट तुरीच्या दरावर होणार आहे. अगोदरच तुरीला बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी आहे. मात्र, आवक वाढली तर आहे त्या दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आस्मानी संकटानंतर आता सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

कधी पर्यंत राहणार आयात मुदत:

केंद्र सरकारने यापूर्वीच सरकारने 4 लाख 27 हजार टन तुरीची आयात केली आहे. त्यामुळे दरामध्ये मोठी घट झालेली आहे. आता कुठे तुरीचा हंगाम सुरु झाला असताना केंद्र सरकारने तूर आयातीला मुदतवाढ दिलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत असलेली मुदतवाढ आता 31 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. तर बंदरावर आयातीसाठी तब्बल 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तुरीचे दर कायम दबावात राहणार आहेत. हमीभावापेक्षा कमी दर असतानाही तूर आयातीची गरजच काय होती असा सवाल उपस्थित होत आहे.

तुरीचे दर कमी होण्याचा धोका:

एप्रिल ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान केंद्र सरकारने केवळ तुरीचीच नाहीतर मूग आणि उडदाचीही आवक केली होती. त्यामुळे आता तूर आयातीला मुदतवाढीची आवश्यकता नव्हती. पण एकीकडे कमीचा हमीभाव देऊनही आता या निर्णयामुळे थेट दरावर परिणाम होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून तूरीची आवक सुरु झाली होती. त्या दरम्यान, हमीभाव केंद्र सुरु नसल्याने त्यापेक्षा कमी दरात तुरीची विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे. अशातच तुरीच्या आयातीला मुदतवाढ केल्याने भविष्यात दर कमी होण्याचा धोका हा कायम आहे.

केंद्र सरकार का असे निर्णय घेत आहे.

देशभरातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून होत आहे. संकटात असलेल्या बळीराजाला मदतीचा हात न देता केवळ स्वार्थासाठी असे निर्णय होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: