या कांद्याचे भाव तेजीत : विक्रीसाठी बाजारात येऊ लागला

onoin

पांढरा कांदा तेजीत

Alibagh taluka अलिबाग तालुक्यात १०० हेक्टरवर white onion पांढऱ्या कांद्याची लागवड होत असे. यंदा अलिबाग तालुक्यात २२७ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे.

लहान कांदा १५० रुपये माळ तर मोठा कांदा २५० रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. मागणी वाढल्याची तुलनेत पुरवठा कमी असल्याने कांद्याचे दर चढे आहेत.

या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली. मागील वर्षी २३० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षी पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात घटले आहे. यंदा केवळ अलिबाग तालुक्यात २२७ हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसाचा काही प्रमाणात कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे.

white onion size पांढऱ्या कांद्याचा आकार मोठा असल्याने कांद्याला चांगला दरही मिळत आहे. अगदी सुरुवातीला ३५० रुपये दराने कांद्याची माळ विकली गेली. आता बाजारात आवक वाढल्याने आता लहान कांदा १५० ते २०० रुपये माळ तर मोठा कांदा २५० ते २८० रुपये प्रती माळ दराने पांढरा कांदा विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला गेल्या वर्षी भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे या कांद्याला असणारी मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. मात्र त्या तुलनेत यावर्षी उत्पादन वाढलेले नाही. पूर्वी रायगड जिल्ह्यातच या कांद्याला मोठी मागणी होती. आता मात्र मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातूनही कांद्याची मागणी होत आहे.

या कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने सेंद्रिय organic production पध्दतीने घेतले जाते. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे कांद्याला आंतराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळू शकते. पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर आता कांद्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना यासाठी कृषी विभागामार्फत प्रोत्साहन दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: