प्राण्यांमुळे मनुष्यास होणारे आजार जाणून घ्या.

श्वान दंश (रेबीज) 

आजार प्रामुख्याने कुत्रांमध्ये आढळतो. पिसाळलेल्या कुत्र्या मार्फत हा आजार मांजर, वटवाघूळ,कोल्हे, लांडगे, पाळीव प्राणी व मानवाला होतो.

आजार झालेल्या प्राण्याने चावा घेतल्यावरच याचे जंतू दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात. 

उपचार
आजारावर  प्रतिबंधात्मक लस तसेच पिसाळलेला कुत्रा चावल्यावर ही लस मानव व इतर प्राण्यांसाठी उपलब्ध आहे.

लेप्टोस्पायरोसिस 

  आजाराचा प्रसार पावसाळ्याच्या सुरवातीस कुत्रा, मांजर , घुशी यांच्या मलमुत्रापासून पाणी  साठलेल्या डबक्यामधून होतो. अशा पाण्याचा माणसाच्या पायांच्या जखमांशी संपर्क आल्यास  माणसाला संसर्ग होतो.

 उपचार: कुत्र्यामध्ये आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण होते.

मानवातील लक्षणे :
ताप येतो, मळमळते,उलट्या होतात, पोट व अंग दुखते, खोकल्यातून रक्त पडते,डोळे सुजतात. कातडीवर लालवर्ण उमटतात.

अंड्यूलेटिंग फीवर 

हा घातक आजार आहे. आजाराची बाधा झाल्यास जनावरे ८ ते ९  व्या महिन्यात गाभडतात. झार पडत नाही.

उपचार : आजाराच्या नियंत्रणासाठी प्राण्यांसाठी लस उपलब्ध आहे.

मानवातील लक्षणे : जनावरांचे कच्चे दूध किंवा संपर्कातून माणसांना आजार होतो. कमी न होणारा ताप, सांधेदुखी, वांझपणा लक्षणे आढळतात.

काळपुळी 

आजार प्राणिजन्य पदार्थांचा संपर्क आणि मुखत्वे लोकरीच्या कारखान्यातील कामगारांच्या मध्ये दिसतो. जनावरांना जिवाणूंची बाधा जमिनीतून तसेच चारा, पाणी आणि पूरग्रस्त भागातून झालेली दिसते.

लक्षण : आजाराने जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो. जनावरांच्या नाकातोंडातून काळसर रक्त आलेले आढळते.

जनावर आजाराने मृत्यू पावल्यास अशा जनावरांना १.८० ते २.१० मीटर खोल खड्यात मीठ,चुना टाकून पुरावे. 

मानवातील लक्षणे  
आजाराची माणसाला बाधा झाल्यास ताप येतो, डोके दुखी, घाम सुटणे, शरीरावर पुरळ येणे व शेवटी मृत्यू होतो.

अंड्यूलेटिंग फीवर 

हा घातक आजार आहे. आजाराची बाधा झाल्यास जनावरे ८ ते ९  व्या महिन्यात गाभडतात. झार पडत नाही.

आजाराच्या नियंत्रणासाठी प्राण्यांसाठी लस उपलब्ध आहे.

मानवातील लक्षणे

  जनावरांचे कच्चे दूध किंवा संपर्कातून माणसांना आजार होतो. 

  कमी न होणारा ताप, सांधेदुखी, वांझपणा लक्षणे आढळतात.

क्षय रोग (टी.बी.)

आजार बाधित जनावरांच्या दुधातून किंवा संपर्कातून होतो. आजार झालेल्या माणसांना सतत ताप येतो, अशक्तपणा, खोकला अशी लक्षणे दिसतात.

दिवसेंदिवस वजन कमी होते.

नायटा 

बुरशीजन्य त्वचा आजार आहे. हा आजार जनावरांना होतो. 

आजारी जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना हा त्वचा आजार होतो.

धनुर्वात 

आजाराचे जंतू मातीमध्ये,गंजलेल्या अवजारावर आढळतात. जखमेशी संपर्क आल्यास आजार होतो.

खरूज

आजार प्रामुख्याने कुत्रा आणि इतर जनावरांना होतो. 

आजाराचा प्रादुर्भाव लहान मुले किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना होते. त्यामुळे अशा जनावरांच्या संपर्कात येऊ नये. तत्काळ उपचार करावा.

आजाराचा प्रसार होण्याचे माध्यम
 नाव  माध्यम   देवी, खरूज  स्पर्श हवा  बर्ड फ्लू, बुरशीजन्य रोग दंश  रेबीज, सरा, प्लेग जखम धनुर्वात खाण्यातून प्रसार  दूध    ब्रूसेलोसिस , टीबीमांस    टानिया , स्वाझिनाटापाणी    सालमोनेलोसिस, अतिसार, जिओडिऑसिस  

प्रतिबंधक उपाययोजना   

आजाराचा प्रसार डास, माशा, गोचीड, पिसवा, उंदीर, विविध कीटक, गोगलगायीमार्फत होतो. या सर्वांच्या वाढीचे ठिकाण वेगवेगळे आहे. डबकी, गटार, शेण, उकिरडे, कुजलेले अन्न वेळेवर नष्ट करावे. 

वैयक्तिक स्वच्छता, रोग निदान, त्यावर योग्य उपचार, वातावरणाची स्वच्छता, जनावरांचे लसीकरण, अन्नपदार्थांची योग्य स्वच्छता, आरोग्य प्रबोधन आणि पशूतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.    

– डॉ.बी.सी.घुमरे,  ९४२१९८४६८१
– डॉ.व्ही.व्ही.कारंडे,  ९४२००८०३२३
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ,जि.सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: