NAFED: नाफेडने केली या पिकाची खरेदी सुरु

Toor News

Toor News

खरीप हंगामातील तूरीची आवक बाजारपेठेत सुरु झाली आहे. मात्र, हमीभावापेक्षा कमी दर बाजारात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. अखेर नाफेड मार्फत सोमवार पासून खरेदी सुरु झाली आहे.

तूर पिकाला 6 हजार 300 चा हमीभाव ठरविण्यात आला होता. मात्र, आवक सुरु होताच व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी सुरु झाली होती. शिवाय शेतकऱ्यांकडेही कोणता पर्याय नव्हता. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाल्याने हमीभावाने तूरखरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. त्याअनुशंगाने अखेर आता प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

पिकाची नोंदणी करणे आवश्यक :

हमीभाव केंद्र सुरु झाली की, थेट तूर ही विक्री करता येणार नाही. त्यासाठी आगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण नोंदणीनुसारच खरेदी होणार. त्यामुळे पिकाची नोंदणी तर नाफेडकडे राहणारच आहे. पण कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे अनियमितता होणार नाही. अन्यथा शेतकऱ्यांच्या नावाखालीच व्यापारी अधिकच्या दरासाठी केंद्रावर मालाची विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार कार्ड, 7/12 उतारा, बॅंक खाते पासबुकची झेरॅाक्स, 8 अ, आदी कागदपत्रे जमा करुन विक्रीपूर्वी नोंदणी ही बंधनकारक राहणार आहे.

नॅशनल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग यांनी सांगितले. खरेदी केंद्रावर मिळणारा दर आणि कृषी उत्पन्न बाजारात तूरीला मिळणारा दर यामध्ये 400 रुपयांची तफावत होती. नाफेडने तूरीचे दर हे 6 हजार 300 रुपये ठरवला आहे तर बाजारात आता 5 हजार 900 रुपयांनी खरेदी केली जात आहे. त्यामुळे प्रति क्विंटलमागे 300 ते 400 रुपये शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. आता केंद्राचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: