हमीभावाप्रमाणेच बाजारपेठेत तुरीचे दर, सोयाबीनची आवक वाढतेय

soyabean Market

आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील बाजारांतही सोयाबनच्या दरात सुधारणा

15 दिवसांपूर्वी तुरीला बाजारपेठेत हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला होता. मात्र, केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे पुन्हा दरात घट सुरु झाली असून अद्यापही ती कायम आहे. दर वाढत असतानाच केंद्र सरकारने जी मे पर्यंत तुरीची आयात केली जाणार होती त्याची मुदत आता डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयात सुरु असल्यानेच तुरीच्या दरात घट होत आहे. दुसरीकडे सोयाबीनचे दर हे स्थिर असून 7 हजार 350 हाच दर योग्य असल्याचे मानत आता आवक वाढत आहे.

तुरीची राज्यात हमीभाव केंद्र सुरु झाली

या केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आला तर हंगामाच्या सुरवातीला बाजारपेठेत तुरीला 5 हजार 800 असा दर मिळत होता. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने अवध्या काही दिवसांमध्ये बाजारपेठेतील दरांनी हमीभाव ओलांडला होता. त्यामुळे यंदा तुरीला विक्रमी दर मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. पण केंद्राने तुरीच्या आयातीची मुदत वाढवली त्यामुळे वाढत्या दराला ब्रेक लागला आहे. एवढेच नाही तर आता दरात घट होऊ लागली आहे.

सोयाबीन आवक वाढतच आहे

गतवर्षी सोयाबीनला 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र, त्यावेळची स्थिती ही वेगळी होती. यंदा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही असा दर मिळालेला नाही. त्यामुळे याच दरावर शेतकऱ्यांनी समाधान मानले आहे. हे होत असलेल्या आवकवरुन लक्षात येत आहे. पण 7 हजार 350 हा दर सुध्दा चांगला असून शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याचे व्यापारी सांगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: