या जिल्हय़ातील शेतकऱ्यांची कांदा लागवडीवर भर

कांदा लागवड बातमी
#Onion_plantation नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिले आहे. यंदा आतापर्यंत सुमारे एक लाख 51 हजार 273 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक 29 हजार 710 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अलीकडच्या काही वर्षांतील नगर जिल्ह्यातील ही विक्रमी लागवड असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात साधारण सात ते आठ वर्षांपासून कांद्याचे उत्पादन घेण्याला प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन वर्षांत अतिपाऊस, रोगाचा प्रादुर्भाव, दरात चढ-उतार आणि कोरोना अशा अनेक संकटांतून कांद्याचे नुकसान झाले. तरीही नगदी पीक म्हणून अलीकडच्या काळात कांदा उत्पादनाला नगर जिल्ह्यात प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, यंदा काही महिन्यांपासून कांद्याचे दर अडीच ते तीन हजारांवर स्थिर आहे.
चालू वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने आतापर्यंत यंदा कांद्याची एक लाख 51 हजार 273 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, हा आकडा पावणेदोन लाखाच्या जवळपास जाण्याची अंदाज व्यक्त केली जात आहे. प्रत्येक तालुक्यांत यंदा कांदा लागवड झाली आहे. जिल्ह्यात अलीकडे कांद्याची सर्वाधिक लागवड आहे.
तालुकानिहाय कांदा लागवड (हेक्टरमध्ये) :
नगर – 25,821, पारनेर – 29,710, श्रीगोंदा – 11,141, कर्जत – 17,186, जामखेड – 2410, शेवगाव – 3859, पाथर्डी – 11,652, नेवासा – 8458, राहुरी – 9761, संगमनेर – 8,169, अकोले – 509, कोपरगाव – 10,354 श्रीरामपूर – 9107, राहाता – 3136