Electric tractor: ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे डिझेल पेक्षा स्वस्त

electric tractor

Agronext : डिझेलच्या किमती मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात वाढ होताना दिसत आहे. कारण शेतीमध्ये उपयोगी येणारी सगळी यंत्रे हे डिझेल आणि पेट्रोल वरच कार्यान्वित होतात. यासाठी कृषी वैज्ञानिक एक स्वस्त पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या कमी करता येतील. जर शेती मध्ये उपयोग येणाऱ्या यंत्रांचा विचार केला तर त्यामध्ये ट्रॅक्टर सगळ्यात जास्त वापरले जाते. त्यामुळे ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये  मोठे बदल होऊ शकतात. या बदलांचा परिणाम म्हणजे ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे होय.

या पार्श्वभूमीवर चौधरी चरण सिंह हरियाणा कृषि विश्वविद्यालय हिसारयेथील  एम.टेक चे विद्यार्थी वेंकटेश शिंदे यांनी केले असून, त्यांना कृषी यंत्रे आणि उर्जा अभियांत्रिकी विभागातील शास्रज्ञ मुकेश जैन यांनी मार्गदर्शन केले . वैज्ञानिकांचा दावा आहे की हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टर च्या तुलनेत १५ ते २५ टक्के खर्च कमी येइल.

Information About Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रक्टर बाबत

या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला विश्वविद्यालयाच्या कृषी इंजिनिअरिंग आणि  प्रौद्योगिकी कॉलेज नेविकसित केले आहे. हे ट्रॅक्टर 16.2 किलोवॅट च्या बॅटरीवर चालते. तसेच डिझेल ट्रॅक्टर त्या तुलनेत याला कमी खर्च येतो. या ट्क्टर मुळे डिझेलच्या वाढत्या किमती पासून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

Features in eclectic tractor: इलेक्ट्रिक ट्रक्टर ची वैशिष्टे

▪️ १.५ टन वजनाच्या ट्रेलर सह हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर एकदा चार्जिंग केल्यावर प्रती तासामध्ये २३.१७ किमी. वेगाने 80 किलोमीटर पर्यंतचे अंतर चालू शकते.▪️ट्रॅक्टर ऑपरेट करण्यासाठी खूप आरामदायक आहे.

Electric tractor Cost : ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी येणारा खर्च

कृषी वैज्ञानिकांच्या मते, या बॅटरीवर चालणाऱ्या ट्रॅक्टर ची किंमत जवळजवळ साडेसहा लाख रुपये आहे. या तुलनेत सारख्या हॉर्स पावर डिझेल ट्रॅक्टरचा विचार केला तर याची किंमत साडेचार लाख रुपये आहे.

या बॅटरी चलीत ट्रॅक्टर ची प्रति तास खर्च रोटावेटर साठी त्यांच्या 332 आणि मोल्ड बोर्ड नांगराला तीनशे एक रुपये आहे.डिझेल ट्रॅक्टर चा खरच हा रोटावेटर सोबत 447 आणि मोल्ड बोर्ड नांगर ला 353 रुपये येतो.त्या तुलनेने ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर चा खर्च हा  डिझेल पेट्रोलच्या तुलनेत 15 ते 25 टक्के स्वस्त आहे

1 thought on “Electric tractor: ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे डिझेल पेक्षा स्वस्त

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: