एफआरपी’ चे तुकडे पाडणाऱ्या आदेशाची होळी

एफआरपी

एफआरपी’चे तुकडे पाडणाऱ्या आदेशाची होळी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

कारखान्यांना एफआरपीचे तुकडे पाडण्यास  शासनाने परवानगी दिली आहे. त्या आदेशाची होळी करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींसमोर शासन आदेशाची होळी करून शेतकऱ्यांनी रोष दाखवून द्या, असे आवाहन अहमदनगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले 

कारखान्याकडून एक रकमी एफ आर पी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलने छेडली. त्या आंदोलनास यश येवून कारखान्याने एफआर पी एक रकमी देण्याचे शासन स्थरावरुन सांगितले.काल परवा माञ शासन स्थरावरुन मंत्रालय संयुक्त सचिव सुबोधकुमार सिंह यांनी काढलेल्या अध्यादेशाचे एफआरपी चे तुकडे बिल करण्यास परवानगी दिल्याचे शासन पत्र निघाल्यामुळे स्वाभिमानी  शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.शासन परीपञकाची होळी करुन टाकळीमियाँ ता.राहुरी येथे आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे.

ऊसदर नियंत्रण समितीच्या सूत्रामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार केवळ संसदेला आहे. तो राज्यांना नाही. तरीही राज्य सरकारने काढलेले परिपत्रक पूर्णतः बेकायदेशीर आहे. आता संघर्ष अटळ असून त्यांचा डाव हाणून पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले. मोरे पुढे म्हणाले की, मुळात केंद्र सरकारने यापुर्वीच काढलेला आदेश पुन्हा एकदा वाचून पहावा, साखर आयुक्तांना आकडेमोड करण्याचा अधिकार दिलेला आहे. सूत्र बदलण्याचा अधिकार दिलेला नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये कारखानदारांच्या दरोडेखोरांचे एक टोळी निर्माण झाली आहे. या टोळीने शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला तर कायदा हातात घेऊ. या वर्षी आम्ही एकरकमी एफआरपी घेतलेली आहेच. आता कारखानदार आणि सरकारमध्ये हिंमत असेल तर दोन तुकड्यांत एफआरपी देत असल्याची घोषणा करून दाखवावी.पुढील काळात साखर कारखाने सुरू करण्याची हिंमत दाखवावी. मग पुढे काय करायचे ते ठरवू. राज्य सरकार आणि कारखानदारांना याची जबर किंमत मोजावी लागेल. राज्य सरकारने कारखानदारांच्या तालावर नाचू नये, असा इशाराही यावेळी  मोरे यांनी दिला.

मोरे यांनी सांगितले की,कारखानदारांना सोबत घेऊन हा शेतकऱ्यांवर दरोडा घातला जात आहे. दरवेळी लुटायला शेतकरीच कसा मिळतो. अ शेतकऱ्यांची ऊसाची रक्कम बिनव्याजी वापरण्यासाठीच हा अध्यादेश काढला आहे.या आदेशाची आज होळी केली आहे कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची व्यवस्था करावी एफआरपीचे तुकडे केल्यास कारखानदारांनी कारखाने चालूच करुन दाखवावी. दरोडे खोरांचे हे षडयंञ आहे असा आरोप मोरे यांनी केला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, ज्ञानदेव, प्रकाश देठे, प्रमोद पवार, सचिन पवळे, सतिश पवार, भागवत करपे, गोरख शिदे, तुकाराम चोथे, आनिकेत कुलकर्णी, प्रमोद घोडके, राऊसाहेब निमसे, भिमाभाऊ शिदे, राऊसाहेब घोरपडे, संजय आढाव, गोरख करपे आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: